"सोळा वर्षांच्या आपल्या मुलाशी फोनवर केवळ काही सेकंद जास्त बोलणं त्याला चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी माग काढून त्याला आपल्या बंदुकीचं लक्ष्य बनवलं. त्याचा मुलगा, मुलगी, आणि बायको जीवाच्या भीतीने पळाली. कुठल्याच देशात त्यांना थारा मिळत नव्हता. इक़्वेडोर, पेरू, ब्राझील, साउथ आफ्रिका आणि मोसाम्बिक अशा ठिकाणी रहात रहात पर्यटक म्हणून त्यांनी अर्जेंटिनामधे प्रवेश मिळवला आणि ब्युनोस आयर्स येथे अखेर त्यांना आश्रय मिळाला. तिथे नावं बदलून ते सामान्य जीवन जगू लागले. "
ही कुठल्याही सिनेमाची कथा नसून एक सत्यकथा आहे. कोलंबियामधील अत्यंत क्रूर, अट्टल गुन्हेगार असणाऱ्या ड्रग माफिया "पाब्लो एस्कोबार" आणि त्याच्या निष्पाप कुटुंबाची ही खरीखुरी चित्तरकथा.
कोलंबियात १९८० च्या दशकात या ड्रग माफियाचा प्रचंड दरारा होता. पाब्लो एस्कोबारला लहानपणी खरं तर कोलंबियाचा प्रेसिडेंट बनायचं होतं. प्रेसिडेंट बनू शकला नाही पण अत्यंत चुकीच्या मार्गाने तो त्या देशावर जवळ जवळ हुकुमत गाजवणारा क्रूरकर्मा मात्र बनला. पेरू आणि बोलीव्हियातून कोको पेस्ट आणून, तिच्यावर प्रक्रिया करून ती अमेरिकेत विकणं हा धंदा सुरु करून पुढे त्याने ड्रग विकणारी सगळ्यात धोकादायक अशी टोळी निर्माण केली. या टोळीने कोलंबियावर अक्षरशः वर्चस्व गाजवलं.
"प्लाटा ओ प्लोम्बो" म्हणजे शब्दशः "चांदी किंवा शिसे " या सूत्राने ही टोळी काम करे. म्हणजे कोलंबियातील कोणीही राजकारणी, जज किंवा पोलीस जर एस्कोबारच्या विरोधात जाऊ लागला तर त्याला प्रथम लाच देऊ पहायची नाहीतर सरळ मारून टाकायचं. अशा रीतीने कोलंबियाच्या प्रेसिडेंटपदाचा उमेदवार लुईस कार्लोस गालान आणि कोलंबियाचे न्यायमंत्री रोड्रिगो लारा यांची हत्या एस्कोबारने करवली. त्याच्या "मेडेलिन कार्टेल(टोळी)" ने अशा रीतीने हैदोस घातला होता. अर्थात तो अत्यंत हुशार गुन्हेगार होता. मेडेलिन शहरासाठी त्याने भरपूर धनदान केलं. चर्चेस बांधली. शाळा, उदयाने शिवाय गरिबांसाठी घरेही बांधली. त्यामुळे मेडेलिन जनतेच्या मनात त्याने "दाता" म्हणून घर केलं. त्याची स्वतःची अनेक मोठी घरं होती, विमानं होती. चक्क एक प्राणी संग्रहालयदेखील होतं. ऐंशीच्या दशकात एस्कोबार हा जगातल्या अत्यंत प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होता. आणि जगातला सातवा "श्रीमंत"!
अमेरिकन सरकारला एस्कोबार ड्रगच्या व्यापाराच्या आरोपाखाली हवा होता, परंतु कोलंबियात त्याची प्रचंड दहशत, त्यामुळे कोलंबियन सरकार आणि एस्कोबारच्या वकिलांनी मिळून एक मधला मार्ग काढला आणि त्याला शरण येण्यास सांगितले. त्याला ५ वर्षांचा कारावास देण्यात आला. या बदल्यात त्याने स्वतःच स्वतःसाठी तुरुंग बांधावा. असे केल्यास त्याला अमेरिकेच्या हवाली देण्यात येणार नाही असा तो मधला मार्ग. मग काय? तुरुंगाच्या नावाखाली त्याने "Le Cathedral" नावाचा मोठ्ठा किल्ला बांधला ज्यात जाकुझी, धबधबा, बार आणि चक्क सॉकरचं मैदान होतं. शिवाय इतर मालमत्ता, पैसे होतेच. तुरुंगातही त्याच्या कारवाया सुरूच राहिल्या. आपल्याशी गद्दारी केलेल्या आपल्याच टोळीतील अनेकांना त्याने या तुरुंगात आणून मारलं. मग मात्र त्याला साध्या तुरुंगात हलवण्याचा निर्णय सरकारने घेतला. ते कळल्यावर एस्कोबार पळाला आणि लपून राहू लागला. शेवटी १९९३ मधे मेडेलिन पोलिसांनी त्याला मारण्यात यश मिळवलं. अशी ही या क्रूरकर्म्याची कथा..
पाब्लोचं वादळी आयुष्य वाचताना मनात विचार आला की आपण सामान्य माणसे आपलं साधारण आयुष्य जगताना, त्यात कितपत चांगले किंवा वाईट योग येणार आहेत हे जाणून घेण्यासाठी पत्रिका बनवतो. ज्योतिषांना दाखवतो. माणूस जन्मल्या-जन्मल्याच तो पुढे कोण आणि कसा होणार आहे हे खरंच ठरलेलं असतं का? "विधिलिखित" असं ज्याला म्हणतात. जन्मवेळेवरून केलेल्या पत्रिकेच्या अभ्यासावरून ती व्यक्ती पुढे कोण होणार आहे हे कळत असेल तर पाब्लो एस्कोबार किंवा त्याच्यासारखे अन्य हिंस्त्र मानव कुठलं नशीब घेऊन जन्माला येतात? आणि जर आधीच हे भविष्य कळणार असेल तर मग अशी माणसे घडण्यापासून थांबवता आली पाहिजेत, नाही का? शिवाय या माणसांच्या हातून मारलं जाण्याचं कमनशीब घेऊन जन्माला आलेल्या माणसांची पत्रिका नेमकं काय सूचित करत असेल? माझ्यासाठी हा नेहेमीच एक गूढ विषय असणार आहे.
पाब्लो एस्कोबार हा अभिमान वाटेल असा "वडील" नव्हता. जुआन आणि मन्युएला या त्याच्या दोन मुलांनी त्यापायी कसं आयुष्य घालवलं असेल? अर्जेंटिनामधील ब्युनोस आयर्समधे ते सध्या सर्वसामान्य आयुष्य जगतायत पण हा भयानक इतिहास ते पुसू शकले का? त्याबद्दल पुढील लेखात...

No comments:
Post a Comment
आपले मत जरूर मांडा.... :-)